kangana ranaut twitter account suspendentertainment news- कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती देशातील अनेक सामाजिक प्रश्नांवर ट्विटरद्वारे भाष्य करत असते. तिचे ट्वीट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. तसेच तिला आजवर सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल देखील करण्यात आले आहे. पण आता ट्विटरकडून तिचे ट्विटर (twitter account) अकाऊंटच बंद करण्यात आले आहे.

----------------------------------------

Must Read

1) दैनंदिन दिनविशेष - ४ मे (आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन).

2) इचलकरंजी : संक्षिप्त बातम्या.

3) डबल मास्क घाला, कोरोना टाळा (नियोजनातील विषय).

----------------------------------------


kangana ranaut twitter account suspend


ट्विटरच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल कंगनाचे ट्विटर अकाऊंट (twitter account) बंद करण्यात आले असल्याचे तिच्या ट्विटर अकाऊंटवर सध्या दाखवण्यात येत आहे. कंगनाने पश्मिच बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्याबाबत एक ट्वीट केले होते. या वादग्रस्त ट्वीटमुळे (twitter post) तिच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई केली जावी अशी मागणी नेटिझन्सने सोशल मीडियावर केली होती.