gokul lection result updateslocal news- कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या गोकुळ दुध संघाची मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसा निकाल स्पष्ट होत आहे. दरम्यान विरोधी पॅनेलची पहिल्या फेरी अखेर १६ पैकी १४ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यामुळे गोकुळमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागूण राहिले आहे. यामध्ये सर्वाधिक मते विश्वास नारायण पाटील, शशिकांत चुयेकर, रणजित पाटील, आणि अभिजीत तायशेटे यांनी सर्वाधिक आघाडी घेतली आहे. याचबरोबर आघाडीकडून चेतन नरके आणि अमरिश घाटगे यांनी आघाडी घेतली आहे.

गोकुळच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत महिला गटात विरोधी गटातील अंजना रेडेकर यांनी १८४ बाजी मारली तर अखेरपर्यंत पिछाडीवर असलेल्या शौमिका महाडिक यांनी सुश्मिता पाटील यांचा ४६ मतांनी पराभव केला.  (local news)

----------------------------------------

Must Read

1) दैनंदिन दिनविशेष - ४ मे (आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन).

2) इचलकरंजी : संक्षिप्त बातम्या.

3) डबल मास्क घाला, कोरोना टाळा (नियोजनातील विषय).

----------------------------------------

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाने विजयी सलामी देत राखीव गटात विजय मिळविला. अनुसूचित जाती जमाती गटातून माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी विलास कांबळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके यांनी विश्वास जाधव, इतर मागासवर्गीय गटात अमरसिंग पाटील आणि पी. डी. धुंदरे यांचा पराभव केला आहे. अमरसिंग पाटील यांनी ४३६, सुजित मिणचेकर यांनी ३४६ तर बयाची शेळके यांनी २३९ मतांनी विजय मिळविला.