gokul election kolhapurpolitics news- गोकुळच्या निवडणुकीत (election result) क्रॉस व्होटिंग होईल असा अंदाज आजपर्यंत वर्तविला जात होता. मात्र, राखीव गटातील निकाल हाती आल्यानंतर पॅनेल टू पॅनेल मतदान झाले असल्याचे समोर येत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (political leader) यांच्या विरोधी आघाडीने सत्ताधारी गटाची काळजी वाढविली आहे. राखीव गटात सर्वच जागांवर निर्णायक मते घेऊन विजय मिळविल्यानंतर सर्वसाधारण गटात काय होणार याची धाकधूक लागली आहे. 

महिला गटात शौमिका महाडिक यांनी ४६ मतांनी विजय मिळविला आहे. त्याविरोधात विरोधी आघाडीने प्रथम फेरमतमोजणी मागण्याची तयारी केली मात्र, नंतर त्याबाबत निर्णय झाला नाही.  गेल्या तीन निवडणुकांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील गोकुळमधील संघर्ष तीव्र झाला आहे. मागील निवडणुकीत पालमंत्री पाटील यांनी निवडणुकीत चांगलीच लढत दिली. परंतु त्यांना तीन जागांवरच मिळविता आला होता. त्यातही माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश घाटगे हे कालांतराने सत्ताधारी गटात गेले. त्यामुळे फारसा प्रभाव दिसला नाही. मल्टिस्टेटच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी कोंडी केली होती. 

----------------------------------------

Must Read

1) दैनंदिन दिनविशेष - ४ मे (आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन).

2) इचलकरंजी : संक्षिप्त बातम्या.

3) डबल मास्क घाला, कोरोना टाळा (नियोजनातील विषय).

----------------------------------------

आज झालेल्या मतमोजणीत राखीव गटातील तीन पुरुष आणि दोन महिलांनी लक्षवेधी मते घेतली. आमदार सुजित मिणचेकर, अमरसिंग पाटील आणि बयाजी शेळके यांनी बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब करत विरोधी आघाडीचे खाते खोलले आहे. महिला गटात अंजना रेडेकर यांनी विजय मिळविला तर अनुराधा पाटील-सरुडकर आणि आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता यांच्यात जोरदार चुरस झाली. शेवटच्या टप्प्यात सुश्मिता पाटील यांनी बाजी मारली.  (politics news)

सत्तारुढ पॅनेलच्या सर्वसाधारण गटात  रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील (political leader), अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवकर प्रताप पाटील, प्रकाश चव्हाण, राजाराम भाटळे, रणजित बाजीराव पाटील (election result)  यांचा समावेश आहे. 

विरोधी पॅनेलमध्ये माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, एस. आर. पाटील,  प्रकाश रामचंद्र पाटील, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, नाविद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, रणजित  कृ. पाटील अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, प्रा. किसन चौगुले,  बाबासाहेब चौगुले, विद्याधर गुरंबे, महाबळेश्वर चौगुले यांचा समावेश आहे.