maharashtra politics newspolitics news- राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत महाविकासआघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (political leader) यांनी केला. 

‘तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’, अशा आशयाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत केले होते. त्यानंतर भाजपने महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे आता भाजप राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. 

---------------------------------------

Must Read

1) दैनंदिन दिनविशेष - ४ मे (आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन).

2) इचलकरंजी : संक्षिप्त बातम्या.

3) डबल मास्क घाला, कोरोना टाळा (नियोजनातील विषय).

----------------------------------------

चंद्रकांत पाटील (political leader) आणि प्रवीण दरेकर या दोघांनी यासंदर्भात थेट भाष्य करणे टाळले असले तरी देवेंद्र फडणवीस बोलत असतील तर त्यामध्ये तथ्य असेलच, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेने जोर धरायला सुरुवात केली होती. (politics news)

मात्र, हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सर्व दावे फेटाळून लावले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील 25 वर्ष चालेल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.