haking


कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागताच सायबर(cyber) भामट्यांचा सुळसूळाट झाला आहे.  महाराष्ट्रातील संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवेत न येणारा वर्ग घरीच आहे. त्यात बहुतांष लोक  पाहताना दिसतात.  त्यामुळे सायबर(cyber) चोरट्यांनी  या लोकांकडे आपला फोकस वळवला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी याबाबत नागरिकांना  सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

  IPL चे लाईव्ह स्ट्रिमिंग तेही मोफत देण्याच्या नावाखाली सायबर(cyber) हॅकर्स इंटरनेट वापरकर्त्यांची फसवणूक करतात. त्याकरीता लिंक ऑफर केली जाते. पोलिस आणि तज्ज्ञांकडून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात येत असल्यामुळे सायबर हॅकर्सने आता वेगळे पर्याय शोधायला सुरवात केली आहे.
--------------------------------

Must Read

1) आजचे राशीभाविष सोमवार ,19 एप्रिल २०२१..!!

2) दैनंदिन दिनविशेष - १९ एप्रिल.


---------------------------------------


 इंटरनेट वापरकर्त्यांना व्हाट्सअपच्या(Whatsapp) माध्यमांतून एम्बेड लिंक पाठवण्यात येते.  त्या लिंकवर क्लिक करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत आणि हाय डेफिनेशन IPL दाखवण्याचे अमिष देण्यात येते. 
 वापरकर्ते त्या  लिंकवर जाऊन आपले नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आदी डिटेंल्स भरतात. त्यानंतर येणारा ओटीपी देखील नमूद करतात. त्यामुळे हँकर्सला तुमच्या मोबाईलमधील वयक्तिक डेटा अक्सेस मिळतो. 
 हँकर्सने एकदा तुमचा डेटा चोरला तर,  ब्लॅकमेल, सेक्स्टोर्शन, सायबर ऍटॅक सारख्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. 
 
त्यामुळे कोणत्याही फेक आणि मोफत स्ट्रिमिंगच्या लिंक क्लिक करू नये असे सायबर पोलिसांनी सांगितले आहे.