Poison murder casecrime news-  मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून बोलावून विष (Poison) पाजून खून (murder) केल्याची घटना येथे उघडकीस आली. दीपाली पवार (वय २५, वड्डर गल्ली, अंकली) असे दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. तिचा खून करणाऱ्या युवकाचे नाव राजू कुरबर (वय २९, रा. अंकली) असे आहे. लग्नातील अडथळा दूर करण्यासाठी त्याने हे कृत्य केले. चिक्कोडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

दीपाली आणि राजू यांचे प्रेमसंबंध होते. राजूच्या घरच्यांनी दुसरीकडे स्थळ पाहून साखरपुडा केला होता. दीपालीशी लग्न करण्याची इच्छा त्याने घरी बोलून दाखवली होती. दुसऱ्या जातीच्या मुलीबरोबर लग्न करू नको, असे सांगून घरच्यांनी दुसरीकडे त्याचे लग्न ठरवले. २१ जानेवारीस साखरपुडा झाला होता. २२ जानेवारीस राजूने दीपालीला फोन करून, ‘आमच्या घरच्यांना आपले लग्न मान्य नाही. तू चिक्कोडीला ये, तेथे रजिस्टर लग्न करूया’ असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून दीपाली आली.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

राजूने दीपालीला साखरपुड्याचा विषय सांगितला. ही गोष्ट समजताच दीपालीने राजूबरोबर वाद घातला. ‘मला सोडून तू दुसऱ्या मुलीबरोबर लग्न कसे करू शकतोस? यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. आपल्या लग्नात दीपाली अडचण ठरेल, या भीतीने राजूने तिला बाहेर नेले. जेवण झाल्यानंतर कोल्ड्रिंक्‍समध्ये विष (Poison) मिसळले. कोल्ड्रिंक्‍स प्यायल्यानंतर दीपाली अत्यवस्थ झाली. राजूने स्वतः दीपालीला रुग्णालयात नेऊन उपचाराचे नाटक केले. उपचार सुरू असतानाच २४ जानेवारीस दीपालीचा मृत्यू झाला. त्यावेळी राजू आणि त्याचा मित्र सुरेश ढंग (रा. अंकली) तेथून फरारी झाले. हे प्रकरण रात्री उशिरा उघडकीस आले.