death


यड्राव ता. शिरोळ येथील रेणुका नगरमध्ये दारूच्या (alcohol) नशेत गटारात पडून युवकाचा मृत्यू (death) झाला संदीप वासुदेव मांगलेकर वय वर्षे 32 राहणार​ शिरगावे मळा​ यड्राव असे युवकाचे नाव असून याबाबतची वर्दी सदाशिव किसन कोरवी वय वर्ष बत्तीस राहणार यड्राव यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

मयत संदीप मांगलेकर हा सदाशिव कोरवी यांचेकडे​ वही फनी कामगार म्हणून कामाला होता तो गेल्या दोन दिवसापासून​ दारुच्या (alcohol) नशेतच होता.​ रेणुकानगर येथे लहान​ मुले खेळत असताना गटारीत कोणीतरी पडले असल्याचे निदर्शनास आले. 

--------------------------------
Must Read


1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

घटनास्थळी पोलिस पाटील जगदीश संकपाळ, होमगार्ड संदीप काळगे हे येऊन पाहिले असता गटारीत तोंड बुडलेल्या अवस्थेत एक युवक पडल्याचे निदर्शनास आले. त्याला सरळ करून पहिले असता संदीप मांगलेकर हा​ मयत स्थितीत (death) आढळला. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी गाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.