डिंगणे येथे बागायतीत काम करून घरी जाणाऱ्या कामगारावर (Worker) अचानक गव्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी (Injured) झाला. रमेश गोप (वय 45), असे जखमी कामगाराचे नाव असून तो परराज्यातील आहे. डिंगणे-बाबरवाडी येथील रस्त्यावर काल (ता.12) रात्री उशिरा ही घटना घडली. डिंगणे-बाबरवाडी रोडवर नेहमी दिवसाढवळ्या गवा रेड्याचा कळप निदर्शनास येतो.
काल सायंकाळी उशिरा याच मार्गावरून रमेश गोप शेतातील काम आटोपून चालत घरी जात होते. अचानक मागाहून गव्यांचा कळप आला. गोप यांना काळोखामुळे गवे आल्याचे समजले नाहीत. या कळपातीलच एका गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. गव्याचे शिंग (Cow horn) पायात घुसल्याने रमेश गंभीर (Injured) जखमी झाले. या हल्यामध्ये रमेश यांच्या पायाला मोठी जखम झाली. अशा अवस्थेत रमेश हे जीव वाचवत एक किलोमीटर चालत डिंगणे गावात गेले. त्यांनी याची कल्पना डींगणे माजी सरपंच जयेश सावंत यांना दिली.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष रविवार,14 फेब्रुवारी २०२१..!!
2)इचलकरंजी युवकावर खूनी हल्ला...!!
3)कोल्हापुरात 100 एकरमध्ये आयटी पार्क उभारणार : उद्योगमंत्री..?
यावेळी जयेश सावंत व डिंगणेवासीयांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या घटनेची माहिती मिळताच वनपाल श्री. सुतार यांनी आरोग्य केंद्रात येत जखमीची विचारपूस केली. या परिसरात गव्यांच्या वास्तव्याने भीतीचे वातावरण (atmosphere of fear) असून गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी डिंगणेवासीयांनी केली आहे.
रोणापालमध्ये गव्यांनी केला पाठलाग
बांदा - रोणापाल तिलारी कालव्याजवळ आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोन गवे ग्रामस्थांच्या दृष्टीस पडले होते. त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा त्यांनी आपला मोर्चा तळेवाडी व देऊळवाडीतील भरवस्तीत वळवला. त्याचदरम्यान शेतकरी प्रकाश गावडे यांनी गव्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता एक गवा त्यांच्या अंगावर धावून आल्याचे त्यांनी सांगितले. काही फुटांच्या अंतरावर गवा होता, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच बचावल्याचे त्यांनी सांगितले. झालेला प्रकार ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु तोपर्यंत गव्यांनी मोर्चा जंगलाच्या दिशेने वळवला. झोपी गेलेल्या वनविभागाला जाग कधी येणार अन् आमचे गव्यांपासून संरक्षण कधी करणार? असा सवाल आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी केला.