Women's Roadblockऑनलाइन टिम :

गावभागातील टिळक रोड, ढोरवेस, चांदणी चौक परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा(Water Supply) होत असल्याच्या कारणावरुन नगरसेविका (Corporator) सौ. संता महिलांनी नगर वर्षा जोग यांच्या नेतृत्वाखाली चांदणी चौकात रास्तारोको आंदोलन केले. अर्धातास सुरु असलेल्या या आंदोलनाने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. अखेर भागात पूर्ववर पाणी पुरवठा करण्याच्या आधासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.येथील चांदणी चौक, ढोर बेस, टिळक रोड परिसरात दररोज सकाळच्या वेळेत पाणी पुरवठा (Water Supply) केला जात होता. काही दिवसांपासून या बेळापत्रकात अचानकपणे बदल करत वेळी-अवेळी अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. या भागातील अनेक महिला उदरनिर्वाहासाठीसकाळी कामावर जात असल्याने बिघडलेल्या वेळापत्रकाने त्यांना पाणी मिळत नव्हते. या संदर्भात प्रशासनाला वारंवार कळवूनसुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. 

------------------------------

Must Read

1) आजचे राशीभाविष बुधवार,11 फेब्रुवारी २०२१

2)पुणे विद्यापीठाच्या परीक्षा बहुपर्यायी, ऑनलाइन!

3) पाकिस्तानात दहशतवादाची 'पाठशाळा'; ते 100 काश्मिरी तरुण गेले कुठे ?

-------------------------------


प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने भागातील संतप्त महिलांनी नगरसेविका सौ वर्षा जोंग यांच्या नेतृत्त्वाखाली चांदणी चौक परिसरात घागरीसह जमून चोहोबाजूंचे रस्ते रोखून धरले. सकाळची वेळ आणि अचानक रास्तारोकोमुळे (Road Block) या मार्गावरून होणारी वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर अशोक स्वामी, बाळासहेब कलागते, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे आदींसह अधिकारी आंदोलनस्थळी आले. त्यावेळी महिलांनी प्रश्नांची सरबत्ती करत पूर्वीप्रमाणेच या भागात पाणी सोडण्यात (Releasing Water)  यावे अशी मागणी केली. त्यानुसार उपरोक्त भागात पूर्वी ठरल्यानुसारच पाणी सोडण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, यावेळी भागातील रस्ते, गटारी व अन्य समस्यांबाबतही नागरिकांनी म्हणणे मांडत त्या सोडविण्याची मागणी केली. आंदोलनामध्ये अलका माळी, सुजाता जॉग, प्रेमा नेमिष्टे, उषा माळी, शांता मगदूम, सारिका शेळके, देवाक्का सोलगे यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.