crime news- दिराने 35 वर्षीय विधवा भावजयीवर मध्यरात्री बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता (molestation) ही सासु, सासरे, मुले व दिरासह एकत्र राहते. तिच्या पतीचे एक वर्षापूर्वीच निधन झाले आहे. बुधवारी मध्यरात्री पीडिता लघुशंकेसाठी उठली असता दिराने ही संधी साधून तू मला खूप आवडतेस, असे म्हणत शरीरसुखाची मागणी करुन पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केला असता त्याने पीडितेला बाहेर आणून बाथरुमध्ये बलात्कार (rape) केला.
1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…
2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती
3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक
--------------------------------
हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी त्याने धमकी दिल्याचे पीडीतेने (molestation) फिर्य़ादीत म्हटले आहे. दरम्यान, घाबरलेल्या पीडितेने भीतीनेच रात्र काढली. सकाळी उठल्यावर बहिण व इतरांना माहिती देऊन थेट एमआयडीसी पोलीस गाठले. महिला उपनिरीक्षक कांचन काळे यांनी पीडितेचा जबाब नोंदविला आहे. आरोपी हा कपडे विक्रीचा व्यवसाय करत असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.