whatsapp privacy policy

व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसी (privacy policy) 15 मेपासून लागू होणार आहे. युजर्सकडे आणखी काही महिने असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. परंतु युजर्सनी जर ही नवी प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट केली नाही, तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या मर्चेंट सपोर्टला पाठवण्यात आलेल्या एका ईमेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जे युजर्स 15 मेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करणार नाहीत, ते या अ‍ॅपवर आलेले मेसेज (WhatsApp Message) वाचू शकणार नाही तसंच युजरला कोणालाही मेसेज पाठवता येणार नाहीत. केवळ काही दिवसच युजर्स कॉल आणि नोटिफिकेशन रिसिव्ह करू शकतात.

ईमेलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारा तयार करण्यात आलेल्या FAQ पेजची लिंक आहे. जे युजर्स नवीन प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करणार नाहीत, ते 15 मेपूर्वी आपलं अकाउंट डिलीट करू शकतात



---------------------------------
Must Read

1) कोल्हापुरात रात्रीची संचारबंदी? वाचा काय म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील

2) इचलकरंजीकरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी...!!

3) बिनधास्त राहू नका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

---------------------------------

व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉगपोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये (privacy policy) लागू करण्यात आलेल्या अटी पर्सनल मेसेजवर परिणाम करत नाही. हे बदल व्हॉट्सअ‍ॅपवरील ऑप्शनल बिझनेस फीचर्सशी संबंधित आहेत.

ही नवीन पॉलिसी लागू झाल्यानंतर युजर्सचा डेटा (users data) कोणत्याही पद्धतीनं लीक होणार नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. हा डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार असल्यानं फेसबुक किंवा व्हाट्सअ‍ॅप तो पाहू शकणार नाहीत, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने सुरुवातीला 8 फेब्रुवारी रोजी हे बदल लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु युजर्समधील गोंधळाचं वातावरण आणि मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर ही पॉलिसी पुढे ढकलण्याचं ठरवलं होतं. आता युजर्सला 15 मेपर्यंत नवी प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करावी लागणार आहे, अन्यथा अकाउंट बंद होऊ शकतं.