whatsapp features
Technology- पॉप्युलर मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअप अपडेटद्वारे नवीन फीचर्स देत असते. लेटेस्ट बीटा अपडेटमध्ये कंपनी एक नवीन फीचरची टेस्टींग करत आहे. या फीचर (whatsapp features) अंतर्गत एक डेडीकेटेड बॅज असेल, ज्याचा वापर ग्रुप चॅटमध्ये लोकांना मेन्शन करण्यासाठी केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, हे फीचर पिन मॅसेज ऑपशनसोबत आणले जाऊ शकते.

ention badge फीचर

Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअपने नुकतेच 2.21.3.13 बीटा अपडेट जारी केले आहे. नव्या अपडेटद्वारे ग्रुप चॅट्समध्ये एक मेन्शन बॅज दिला जाईल. हे फीचर समजण्यास सोपे आहे. व्हॉट्सअपमध्ये ग्रुप चॅटच्या दरम्यान तुम्हाला कुणी मेन्शन करताच, गु्रप सेलमध्ये एक नवीन बॅज येईल. व्हॉट्सअपमध्ये मोठ्या कालावधीपासून मेन्शनचे ऑपशन मिळत आहे, ज्याद्वारे तुम्ही ग्रुप चॅट्समध्ये मॅसेज लिहिताना कोणत्याही मेंबरला टॅग करू शकता. आता नवीन फीचर याच प्रक्रियेला आणखी चांगले करण्यासाठी असू शकते.

------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------

नवीन स्टीकर पॅक

वर सांगितलेल्या फीचरशिवाय व्हॉट्सअपमध्ये (whatsapp features) अँड्रॉइड यूजर्ससाठी नवीन स्टीकर पॅक सुद्धा दिले जाऊ शकते. या स्टीकरचा वापर मित्र आणि प्रेम दर्शवण्यासाठी यूजर्स व्हॉट्सअपच्या कोणत्याही चॅटमध्ये जाऊन स्टीकर आयकॉनवर टॅप करावे लागेल. टॅप केल्यानंतर ऑल स्टीकर सेक्शन मध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला सर्वात वर नवीन पॅक दिसेल.

व्हॉट्सअप वेबसाठी बायोमेट्रिक लॉक

व्हॉट्सअपने नुकतेच आपल्या वेब आणि डेस्कटॉप व्हर्जनसाठी फेस आणि फिंगरप्रिंट अनलॉकचे फीचर जारी केले आहे. या अंतर्गत डेस्कटॉपवर व्हॉट्सअपचा वापर करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी यूजरला फेस किंवा फिंगरप्रिंट वापरण्यासाठी विचारले जाईल. मात्र, यासाठी तुमची इच्छा असणे आवश्यक आहे.