egg good or badhealth tips- आजकालच्या काळात प्रत्येकाची धावपळ सुरू असते. त्यामुळे घरातील किराणा माल असो किंवा इतर काही सामान आपण सुट्टीच्या दिवशी एकत्रच भरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. यामधील काही वस्तू बरेच दिवस चांगल्या राहतात तर काही वस्तू अगदी कमी काळात खराब होतात आणि याचा आपल्याला थांगपत्ताही लागत नाही. अशा असंख्य पदार्थांपैकीच एक म्हणजे अंड! रोज अंड (egg) खाणारे लोक देखील याचा शोध लावू शकत नाहीत की आपण खात असलेले अंडे ताजे आहे की जुने, खराब आहे की चांगले?

बहुतांश वेळा आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी मात्र अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात. मग अशावेळी आपण कसं ओळखायचं की ही अंडी खाण्यालायक आहेत का? चिंता करू नका, कारण हे ओळखण्यासाठी काही पद्धती आहेत. जे आपली निर्विवादपणे मदत करू शकतात. चला तर मग जाणून घ्या त्या खास पद्धती!

एक्सपायरी डेट काय आहे?

लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी अंड हे अत्यंत लाभदायक मानले जाते. पण जर अंडी ताजी व चांगली नसतील तर यामुळे फक्त रेसिपीचा स्वादच बिघडत नाही तर यामुळे आपल्या आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत अंडी ताजी आहेत का आणि ती खराब तर झाली नाहीत ना? हे पाहण्याचा सोपा मार्ग असतो तो म्हणजे अंड्यांच्या बॉक्सवर लिहिलेली तारीख! अंड्याच्या बॉक्सवर लिहिलेल्या तारखेवरून तुम्ही त्याच्या क्वालिटीचा सहज अंदाज लावू शकता. पण बहुतांश वेळा एक्सपाइरी डेट होऊन गेल्यानंतरही त्याचा वापर केला जातो. अशावेळी जर तुम्ही खरेदी केलेल्या अंड्यावर बॉक्सच नसेल किंवा अंडी तुम्ही कोणत्या लोकल दुकानातून खरेदी केलेली असतील तर मग अंड्यांची गुणवत्ता पारखण्यासाठी तुम्हाला दुसरा मार्ग अवलंबववा लागेल.

------------------------------

Must Read

वास घ्या

आपण भारतीय लोक कोणत्याही पदार्थाच्या सुगंधावरूनच ओळखू शकतो की तो पदार्थ चांगला आहे की खराब झाला आहे. अनेकदा घरातील एखादा शिळा किंवा आंबलेल्या पदार्थांची ओळख सुद्धा आपल्याला त्याच्या वासावरूनच होते. अंडी ताजी व चांगली आहेत का? हे देखील वास घेऊन ओळखता येते. अंडी शिजवलेली आहेत की कच्ची याचा काहीह फरक पडत नाही. तुम्ही दोन्ही पद्धतीच्या अंड्यांचा वास घेऊन शोध लावू शकता. सर्वप्रथम अंड फोडून एका प्लेटमध्ये घ्या. त्यानंतर त्याचा वास बघा कसा येतो आहे. जर वास ठीक असेल तर त्याचे सेवन करू शकता. पण त्यातून सडलेला किंवा घाण वास आला तर ते फेकून द्या. सोबतच प्लेटसुद्धा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. लक्षात ठेवा की न धुता प्लेटचा अजिबात वापर करू नका. तुम्हाला वासावरून अंड्याची गुणवत्ता समजू शकली नाही तर तुम्ही खाली दिलेले इतर पर्याय वापरू शकता.

डोळ्यांनी असं तपासा

अंड (egg)बाहेरून नीट पाहा आणि तपासा की त्याच्या कवचातून कसली पावडर तर पडत नाही ना? किंवा कपट्याला कुठे छिद्र तर नाही ना? असं काही होत असेल तर ते बॅक्टेरियामुळे होऊ शकतं. जर असं काही दिसून येत नसेल तर एका सफेद प्लेट किंवा वाटीत अंड फोडून ओता. आता बघा की त्यात निळा, हिरवा किंवा काळ्या रंगाची काही घाण दिसते आहे का? याव्यतिरिक्त योर्कसुद्धा लक्षपूर्वक पाहा. असं काही दिसत असेल तर अंड ताबडतोब फेकून द्या. प्लेट गरम पाण्याने धुवून घ्या. जर आपणास अंड्यातील पिवळ बलक किंवा पांढरं पाणी दिसत असेल तर ते दर्शविते की अंड्यांच्या गुणवत्तेत अभाव आहे. पण याचा तुम्ही वापर करू शकता कारण ते खराब नसतं.

अंडी बुडाली पाहिजे की तरंगली पाहिजे?

अंड ताजं आहे की जुनं, खराब आहे की चांगलं हे पाहण्याचा सर्वात जुना आणि रामबाण उपाय आहे तो म्हणजे अंड पाण्यात टाकून बघणं. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका बादलीत, वाडग्यात किंवा डब्ब्यात पूर्ण भरून पाणी घ्यावं लागेल. यानंतर अंड त्या पाण्यात टाकावं लागेल. जर अंड बुडून पाण्याच्या तळाला गेलं तर समजून जा की ते चांगलं व ताजं आहे आणि अंड पाण्याच्या वरच तरंगू लागलं तर समजून जा की ते खराब व शिळं आहे. असं यासाठी कारण अंड जर जुनं व शिळं असेल तर त्याच्या आतमध्ये हवेची पिशवी बनते ज्यामुळे ते पाण्यावर तरंगते. पण हो, यावरून नेहमीच आपल्याला १०० टक्के रिझल्ट मिळेलच असे नाही. कधीतरी चुकून चांगले अंडे वर राहू शकते व खराब खाली जाऊ शकते.