ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियानं (IND VS AUS) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. एडिलेडमध्ये केवळ 36 (cricket news)  धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर भारतीय संघानं मेलबर्नमध्ये विजय मिळवला. यानंतर सिडनीमध्ये टेस्ट मॅच ड्रॉ केली. शेवटी ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर टीम इंडियानं रोमांचक अंदाजात टेस्ट सीरिज जिंकली. टीम इंडियाच्या या विजयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सलाम केला. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात टीम इंडियाच्या विजयाला प्रेरणादायी म्हटलं. पंतप्रधानांनी केलेल्या या प्रशंसेनंतर विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला.

                         virat-kohli-troll-after-commenting-on-pm-live-modi-post-विराट कोहलीनं पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या प्रशंसेच्या ट्विटवर तिरंग्याची इमोजी कमेंट केली. याचनंतर कोहली (cricket news)   ट्रोल होऊ लागला. पीएमओ (PMO Twitter) या ट्विट हँडलवरुन पंतप्रधानांनी केलेलं हे भाष्य ट्विट करण्यात आलं. यामध्ये लिहिलं होतं, की या महिन्यात क्रिकेट पिचवरुन खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या संघानं सुरुवातीच्या अडचणींनंतर शानदार वापसी करत ऑस्ट्रेलियामध्ये सीरिज जिंकली. आपल्या (cricket news)  खेळाडूंचे परिश्रम आणि टीम वर्क प्रेरित करणारं होतं. विराट कोहलीनं या ट्विटवर तिरंग्याची इमोजी पोस्ट केली. यानंतर चाहत्यांनी त्याला या विजयात त्याचा सहभाग नसल्याचं सांगत ट्रोल करण्यास सुरुवात केली.


एका चाहत्यानं असंही म्हटलं, की हा विजय अजिंक्य रहाणे कर्णधार असताना मिळाला आहे. तुम्ही याचं श्रेय घेऊ (cricket news)  नका. तर एकानं असंही म्हटलं, की विराट कोहली तुम्ही यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता.


पहिल्या टेस्टनंतरच परतला होता विराट -

एडिलेड टेस्टनंतरच विराट कोहली पैटरनिटी लिव्हवर होता. अनुष्का शर्मा आई होणार होती, त्यामुळे आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी विराटला अनुष्कासोबत राहायचे होते. यानंतर अजिंक्य राहाणेनं विराटची (cricket news)  जबाबदारी सांभाळली आणि भारतीय संघानं ऐतिहासिक विजय मिळवला. यावेळी विराट आपल्या घरुन सतत संघाच्या संपर्कात होता. कोच रवि शास्त्री असंही म्हटले होते, की विराट कोहली टीममध्ये असो किंवा नसो टीम त्याच्या विचारानंच खेळते.