ऑनलाइन टिम :
politics reddict- पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर (suicide) राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. भाजपनं या प्रकरणात राठोड यांच्या राजीनाम्याची (resignation) मागणी केली आहे.
यासर्व प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांच्यावर भाजपकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. राठोड हे मीडिया ट्रायलचे बळी ठरलेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
Must Read
1) आजचे राशीभाविष सोमवार,15 फेब्रुवारी २०२१..!!
2) इचलकरंजीचे श्रीमंत घोरपडे नाट्यगृह दुरवस्थेत..!!
3) धावत्या रेल्वेत ओळखीच्या व्यक्तीनेच केला मुलीवर अत्याचार..!!
'भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील. पण, भाजपा नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली असून या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल,' असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.
राजीनाम्याची चर्चा
पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तसंच, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांचं नाव घेत कारवाईची मागणी केली होती. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कारवाई करणार अशी चर्चा असतानाच वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा (resignation) दिल्याच्या चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत.