rohit shrama in test matchऑनलाइन टिम: 

sports news- भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवत ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव १९२ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहली (७२) वगळता इतर कोणताही खेळाडू चांगली खेळी करू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत( test match live score) विराटला नशिबाची साथ मिळाली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामन्यातील रोहितच्या बॅटमधून निघालेला पहिलाच चौकार खास ठरला.

रोहित-शुबमन गिल मैदानात आले. आजच्या सामन्यात संधी मिळालेला ओली स्टोन याने गिलला शून्यावर माघारी पाठवलं. त्यामुळे मैदानात शांतता पसरली होती. पण तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने अप्रतिम कव्हर ड्राइव्ह खेचत चौकार लगावला. रोहितने मारलेला चौकार इतका छान होता की मैदानावरील प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलंच, पण त्याचसोबत ड्रेसिंग रूममध्ये बसलेला कर्णधार विराट कोहली यानेही रोहितचं टाळ्या वाजवून कौतुक ( test match live score) केलं.----------------------------

Must Read

-------------------------------

‘टीम इंडिया’मध्ये तीन बदल

सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं संघात तीन बदल केले. यामध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं. त्याशिवाय कुलदीप आणि अक्षर पटेल यांना वॉशिंगटन सुंदर आणि शाहबाज नदीमच्या जागी संघात स्थान देण्यात आलं. (sports news)