dance video


ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करताना अनेकदा दिसला आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपलं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्यांच्या गाण्यावर त्याने डान्स केला होता. त्यानंतर आता भारतीय संघातील खेळाडू साऊथस्टार विजयच्या गाण्यावर थिरकताना (dance video) दिसले.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------


तमिळ सुपरस्टार थलपती विजय याच्या प्रसिद्ध ‘वाथी कमिंग’ गाण्यावर या भारतीय क्रिकेटपटूंनी ठेका धरला. भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर (instagram account) हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अश्विनसह अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू कुलदीप यादव हेदेखील विजयच्या ‘वाथी कमिंग’ स्टेपची नक्कल करताना (dance video) दिसत आहेत.