valentine Day Alert!


ऑनलाइन टिम:

Crime news- सायबर विश्वात (Cyber World) अनेकदा अशिक्षितच नाही शिक्षित लोकांचीही मोठीच फसवणूक होते. काहीही कल्पना नसतानाच लाखोंची रक्कम क्षणात लुटली जाते. अशावेळी या सगळ्या गोष्टींपासून सावध राहत त्याबाबत साक्षर (Cyber World) होण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्थांसोबत शासनही (government) यासंदर्भानं जनजागृती करत असते.याबाबत व्हॅलेन्टाईन डेच्या (valentine day) औचित्यानं शासनानं एक मोहीम हाती घेतली आहे. 

आता सायबरदोस्त या ट्वीटर अकाऊंटवर सायबर गुन्हांपासून (Cyber Crime) स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं याबाबत माहिती आणि टिप्स दिल्या आहेत. नॅशनल सायबरक्राईम रिपोर्टींग पोर्टलनं ही माहिती दिली आहे.त्यात म्हटलं आहे, सायबर फ्रॉडस्टर्स (cyber fraudsters) तुम्हाला विविध लिंक्सवर क्लिक करायला सांगू शकतात. त्यासाठी ते व्हॅलेन्टाईन डेनिमित्त तुम्ही बक्षिसाची मोठी रक्कम जिंकू शकाल, एखाद्या मोठ्या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये तुम्हाला भरघोस डिस्काउंट (discount) मिळेल अशी आमिष देतात. 

----------------------------

Must Read

------------------------------

एखादा साधासा क्विझ खेळून किंवा लकी नंबरच्या (lucky number) माध्यमातून ही ऑफर दिली जाते.याशिवाय व्हॅलेन्टाईन डेनिमित्त फेक व्यावसायिक किंवा फेक वेबसाईट्स (fake websites) तुम्हाला गिफ्ट व्हाउचर्स (gift vouchers) किंवा मोठ्या डिस्काउंट डील्स (discount deals) देण्याचं जाळं पसरवतात. यात चॉकलेट्स (chocolates), दागिने (jewellery), गुलाब खरेदी करण्याबाबत ऑफर असू शकते.

नॅशनल सायबरक्राईम रिपोर्टींग पोर्टलच्या माध्यमातून आवाहन केलं आहे, की अशा मालवेअर असलेल्या किंवा पैशांचा अपहार करू शकणाऱ्या लिंक्सवर क्लिक करण्याचा मोह टाळा. यातून तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये व्हायरस (virus) जाऊ शकतो. तुम्हाला ऑनलाईन (online) जी काही खरेदी करायची असेल ती विश्वसनीय वेबसाईट्सवरून करा. अशा आकर्षक ऑफर देणाऱ्या डील्सच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवा.