स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेpolitics news- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आ. भुयार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (politics parties) अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर नाराज असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीने नुकतीच राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादीचे (politics parties) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिका-यासाठी आयोजित केला होता. परंतु, कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्णवेळ हजेरी लावली होती. यामुळे राजकीय (politics) वर्तुळात विविध चर्चेना उधाण आले आहे. 

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींमुळे मंत्रिपद न मिळाल्याची खंत देखील आ. भुयार यांनी व्यक्त केली होती. मध्यंतरीच्या काळात खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. पवार आणि शेट्टी यांच्यातील वाद हा राज्याला सर्वश्रूत आहे. या भेटीमुळे दोन्ही नेत्यांमधील वाद निव्वळ होता.