The young man had an affair with his auntऑनलाइन टिम: 

Crime News-उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील मेंककोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नाल्यात अज्ञात तरुणाचा मृतदेह (Corpses) आढळून आला होता. या हत्येच्या घटनेचा उलगडा करतानाच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अनैतिक संबंधांवरून तरुणाची गोळ्या घालून हत्या (murder) करण्यात आली होती, अशी माहिती तपासातून उघड झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुणाचे आरोपीच्या आईसोबत अनैतिक संबंध (Immoral relations) होते. यावरून हे हत्याकांड  (murder)  घडले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. २१ जानेवारी रोजी अज्ञात तरुणाचा मृतदेह एका नाल्यात आढळला होता. राहुल असे या तरुणाचे नाव असल्याचे तपासात समोर आले. तो ग्रेटर नोएडा येथील खोदना कला गावातील रहिवासी होता. मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेचा तपास पोलीस करत होते.

----------------------------

Must Read

-----------------------------

राहुल याचे अभिषेक याच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. अभिषेकची आई ही राहुल याची नात्याने मामी होती. या दोघांच्या अनैतिक संबंधांची माहिती अभिषेकला मिळाली होती. त्यानंतर त्याने राहुलच्या हत्येचा कट रचला होता. राहुलची हत्या करण्यासाठी त्याने मित्र (Friends) हिमांशूची मदत घेतली. ९ जानेवारी रोजी दोघांनी गोळ्या घालून राहुलची हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह कोट गावातील नाल्यात फेकून दिला होता.

चिटहेरा येथील अभिषेक आणि हिमांशू या दोघांना या हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या माहितीवरून गुन्ह्यात वापरलेली कार आणि पिस्तुल पोलिसांनी जप्त (Confiscated) केले आहे. राहुल गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. या हत्येच्या गुन्ह्यात २४ डिसेंबरला तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता.