pooja hegadeentertainment news- बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर (photo on social media) करताना दिसतात. पण कधीकधी या कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. नुकताच अभिनेत्री पूजा हेगडेसोबत देखील असेच काहीसे झाले आहे.

नुकताच अभिनेत्री पूजा हेगडे इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे (instagram story) चाहत्यांशी संवाद साधत होती. तिने ‘Post a photo of’ या ट्रेंडमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी पूजाचे कधी न पाहिलेले फोटो पाहायला मिळाले. दरम्यान एका यूजरने तिच्याकडे न्यूड फोटोची मागणी केली होती.


--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

पूजाने या नेटकऱ्याला उत्तर देत पायाचा फोटो शेअर (photo on social media) केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘नंगे पाव’ असे कॅप्शन दिले आहे. पूजाने दिलेले उत्तर पाहून त्या नेटकऱ्याची बोलती बंद झाली असेल.


पूजा हेगडे ही अतिशय लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने ‘मोहजोंदारो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आशुतोष गोवारिकर यांच्या या चित्रपटात ती अभिनेता हृतिक रोशनसोबत दिसली होती. आता ती लवकरच सुपरस्टार प्रभास सोबत ‘राधेश्याम’ या चित्रपटात दिसणार आहे. पूजा आणि प्रभासला चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.