ऑनलाइन टिम :

घरात जेवण करायचा कंटाळा आला आणि बाहेर हॉटेलमध्येही जायचं नसेल तर ऑनलाइन ऑर्डर करून जेवण मागवणं (online food order) हा एक पर्याय आहे. आपल्यापैकी कित्येक जण ऑनलाइन जेवण ऑर्डर (Meal order)  करतात. तसं ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर अनेकांचे काही ना काही विचित्र अनुभव आहेतच. सध्या अशाच एका ऑनलाइन मागवलेल्या ऑर्डरची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

यूकेतील एका व्यक्तीनं काही पदार्ख आणि कोल्ड ड्रिंक ऑनलाइन ऑर्डर केलं. पण जेव्हा त्याने डिलीव्हरी घेतली तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण त्याला कोल्ड ड्रिंक नव्हे तर त्या बाटलीत चक्क लघवी मिळाली आहे. या व्यक्तीनं आपल्या ट्विटवर (Twitter)  या बाटलीचा फोटो शेअर केला आहे.ऑलिव्हर मॅकमॅनस Oliver McManus असं या व्यक्तीचं नाव. तो इंग्लंडमधील राहणारा आहे. त्याने काही नॉनव्हेज पदार्थ आणि कोकची बाटली मागवले होते. पण कोकच्या बाटलीत लघवी होती. त्याने @HelloFreshUK ला हा फोटो टॅग केला आहे.