actress saumya tandon


टीव्ही मालिका (TV Serial) 'भाभी जी घर पर है'मधून लोकप्रिय (popular) झालेली अभिनेत्री (actress) म्हणजे सौम्या टंडन. यात तिनं केलेली अनीता भाभीची व्यक्तिरेखा अनेकांना आवडते.

सौम्या आजकाल सोशल मीडियावर (social media) कमालीची ऍक्टिव्ह आहे. सौम्या आपला डान्स (dance) युट्यूब चॅनलवर (youtube channel) पोस्ट करत असते. अनेकांच्या कौतुकाचा त्यावर वर्षाव होत असतो. सौम्याचा एक डान्स व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतो आहे. केवळ दोन मिनिटांच्या व्हिडिओत तिनं आपल्या डान्सचा जलवा खासच दाखवला आहे.

या व्हिडिओमध्ये सौम्या लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोणसारखा (Deepika Padukon) घूमर डान्स करते आहे. सौम्यानं हा व्हिडिओ युट्यूब चॅनलवर (youtube channel) पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अप्रतिम एक्सप्रेशन्स देत डान्स करते आहे. सौम्याचा हा व्हिडिओ अतिशय लक्षवेधी ठरला आहे. या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्युज (views) मिळाले आहेत.
---------------------------------

Must Read

1) आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ

2) ...अन्यथा कोल्हापूरचा वणवा राज्यभर पेटेल

3) Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

---------------------------------

सौम्या टंडननं आपल्या टीव्ही करियरची सुरवात 'ऐसा देश है मेरा'च्या (TV Serial) माध्यमातून केली. यात तिनं रस्टी देओलची व्यक्तिरेखा निभावली होती. यानंतर तिनं 'मेरी आवाज को मिल गयी रोशनी'मध्ये अभिनय केला.

याशिवाय तिनं 'कॉमेडी सर्कस के तानसेन', 'मल्लिका-ए-किचन-ऑन-एअर' आणि 'डान्स इंडिया डान्स' असे शोजसुद्धा होस्ट (host) केले आहेत. टीव्हीच्या पडद्यावर सुपरहिट शो 'भाबीजी घर पर है'च्या माध्यमातून सौम्या ही अनिता नारायण मिश्रा ही व्यक्तिरेखा साकारून अक्षरश: घराघरात पोचली आहे.