Tulja Bhavani's darshan was the lastतुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात मृत भाविकाचे नाव महावीर शामदास परदेशी (वय ७०, राहणार नाना पेठ, पुणे) आहे. श्री.परदेशी यांना भोवळ आली. मंदिरात भाविकांस भोवळ आल्यानंतर तेथील सुरक्षा कर्मचारी आणि भाविकांसोबतच्या नातेवाईकांनी श्री.परदेशी यांना एका खासगी रूग्णालयात (Hospital) नेले.

खासगी वैद्यकीय  (Hospital) अधिकाऱ्यांनी भाविकांस मृत घोषित केले. यासंदर्भात परदेशी यांचे पुजारी गणेश साळुंके यांनी सांगितले की, महावीर परदेशी हे गुरुवारी (ता.११) सकाळीच आले होते. त्यांचा दर्शनाचा कार्यक्रम काल पार पडला. आज शुक्रवारी दुपारी ते परत जाणार होते. श्री परदेशी यांना नगारखाना (Town hall) परिसरात भोवळ आली. त्यांना उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.

------------------------------

Must Read

-------------------------------

परदेशी कुटूंबीय मागील तीन पिढ्यांपासुन दश॔नासाठी येथे येतात. सदरची दुर्घटना ( Accident ) घडल्यानंतर त्यांचे पुजारी विकास साळुंके आणि नातेवाईक हे श्री. परदेशी यांचे पार्थिव घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत. तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे सरव्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी या घटनेसंदर्भात पुजारी श्री. साळुंके यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत विचारपूस केली आहे.