ऑनलाइन टिम :
local news- अस्थिर सूत दरामुळे यंत्रमागधारक (loom industry) अस्वस्थ आहेत. सूत दरात वाढ झाली की, कापड दरात वाढ होत असल्याचा अनुभव यंत्रमागधारकांना आहे; पण सूत दरात वाढ होऊनही कापड दर मात्र जैसे थे असल्यामुळे यंत्रमागधारकांची चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सूत दर (yarn) स्थिर कधी राहणार, या विवंचनेत यंत्रमागधारक आहेत.
सध्या यंत्रमागधारकांसमोर अनेक प्रश्न आहेत. शासन पातळीवर उदासीनता आहे. राज्यातील विविध यंत्रमाग केंद्रांतही अतिशय अवस्थता आहे. काही केंद्रांमध्ये यंत्रमाग बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. लॉकडाउननंतर यंत्रमाग उद्योग रुळावर येत असतानाच सूत दरवाढीमुळे या उद्योगाची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. अक्षरशः नुकसान सोसून कापड उत्पादन करण्याची वेळ यंत्रमागधारकांवर आली आहे.
Must Read
1) आजचे राशीभाविष सोमवार,15 फेब्रुवारी २०२१..!!
2) इचलकरंजीचे श्रीमंत घोरपडे नाट्यगृह दुरवस्थेत..!!
3) धावत्या रेल्वेत ओळखीच्या व्यक्तीनेच केला मुलीवर अत्याचार..!!
दिवाळीनंतर सलग दीड महिना सूत दरात (yarn) भरमसाट वाढ होत गेली. महिन्याभरापूर्वी मात्र अचानक सूत दरात घसरण होत राहिली. त्यानंतर पुन्हा सूत दरात वाढ होत चालली आहे. सूत दरातील ही अस्थिरता यंत्रमागधारकांना अडचणीत आणणारी ठरत आहे. साधारणपणे सूत दरात वाढ झाल्यास कापडाला दर व मागणी येत असते. सूत दरात घसरण झाल्यास कापड दरही पडतो. आता सूत दरात वाढ झाल्यानंतर कापडाला दर येईल, अशी अपेक्षा यंत्रमागधारकांना होती; मात्र कापडाला अपेक्षित दर व मागणी नसल्यामुळे यंत्रमाग उद्योजकांत अस्वस्थता आहे. सूत दरातील अस्थिरतेमुळे यंत्रमाग उद्योगही अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे.
सर्वच पातळीवर उदासीनता
सूत दरप्रश्नी यंत्रमागधारक (loom industry) सातत्याने अडचणीत येत आहेत; पण याबाबतच्या यंत्रणेसमोर तो नेहमीच हतबल असल्याचे चित्र पाहावयास मिळते. सूत दर अस्थिर करणारी शहरात यंत्रणा आहे. त्या विरोधात जाण्यास कोणीही यंत्रमागधारक धजावत नाहीत.
नाही. प्रशासन पातळीवरही याबाबत ठोस भूमिका घेण्यात येत नाही. त्यामुळे अस्थिर सूत दरप्रश्नी केवळ यंत्रमागधारकांचेच मरण आहे.