Pisces horoscope



Pisces horoscope- घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तुंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील - तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला (life partner) सांगण्यात अडचणी येऊ शकतात. 
नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये (life partner) भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. कुठला सिनेमा किंवा नाटक पाहून तुम्हाला आज हिल स्टेशनवर जाण्याची इच्छा होईल.
उपाय :- तांब्याचा शिक्का किंवा तुकडा खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील.