tiktok star committed suicide


ऑनलाइन टिम:

लहान वयात प्रसिद्धिच्या झोतात आलेली अमेरिकन  (united state) टिकटॉक स्टार (tiktok star) डेझरिया क्विंट नोएस हिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ती १८ वर्षांची होती. डेझरिया ही टिकटॉकवर Dee या नावाने प्रसिद्ध होती. आत्महत्या करण्यापूर्वी डेझियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. ही तिची अखेरची पोस्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनखाली लिहिले की, ओके, मला माहिती आहे की, मी तुम्हाला खूप इरिटेट करत आहे. मात्र आता ही माझी अखेरची पोस्ट आहे. डेझरियाच्या पालकांनी तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, डेझरियाने आत्महत्या (suicide) केली आहे.

------------------------------

Must Read


मुलीच्या मृत्यूमुळे डेझरियाच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. GoFundMe नावाच्या पेजवर डेझरियाच्या वडलांनी लिहिले की, ८ फेब्रुवारी रोजी माझी मुलगी आम्हाला सोडून गेली. ती माझी मैत्रिण होती. मी माझ्या मुलीचा दफनविधी करण्यासाठी कशाही प्रकारे तयार नव्हतो. ती खूप आनंदी होती. जेव्हा मी घरी यायचो तेव्हा मला रस्त्यावर पाहून ती खूश व्हायची. मला एवढेच वाटते की तिने ताणतणाव आणि आत्महत्येच्या विचारांबाबत माझ्यासोबत बोललं पाहिजे होतं. आपण त्यावर काही तोडगा काढला असता. आता जेव्हा मी घरी येतो, तेव्हा माझी वाट पाहण्यासाठी कुणी नसते.

डेझरिया (tiktok star) सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होती. टिकटॉकवरही तिचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. ती इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरही खूप लोकप्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिने Bxbygirlldee नावाने अकाऊंट उघडले होते. डेझरियाच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.