Three suicides in one dayऑनलाइन टिम :

Crime News-कुपवाडमध्ये दोन तर बामणोलीत एक मिळून एकाच दिवशी वेगवेगळ्या तीनठिकाणी आत्महत्त्या (suicide) केल्याच्या घटना मंगळवारी उघड़कीस आल्याने शहरात चर्चेने खळबळ उडाली आहे. दरम्यान तिन्ही आत्महत्त्येचे नेमके कारण रात्री पर्यंत समजू शकले नाही. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, कुपवाडमध्ये सोमवारी रात्री नऊच्या सुमारास मिरज रस्त्यालगतच्या एका शेवया कंपनीसमोरील विद्युत खांबाला (Electric pole) सोमवारी रात्री प्रवीण बाळासाहेब माळी ( २७,रा.कोंडके मळा बामणोली) याने दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबत बाळासो संभाजी माळी यांनी फ़िर्याद दिली आहे. आत्महत्येचे  (suicide)कारण समजू शकले नाही. पोलिस तपास करीत आहेत.

----------------------------

शरदनगर, कुपवाड येथे राहणाऱ्या विठ्ठल व्यंकटराव कुट्टे (५५ मूळ गाव अथणी, कर्नाटक) याने मंगळवारी सकाळी राहत्या घरातील छतास नॉयलॉन (Nylon) दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सुभाष चंद्रकांत देसाई यांनी फ़िर्याद दिली असून अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.

तसेच बामणोली (कोंडके मळा) येथील प्रियांका भाऊसो व्हनमोरे (२८) हिने सोमवारी रात्री बेडरूममधील छताच्या लोखंडी ॲगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. भाऊसो सखाराम होनमोरे यांनी फ़िर्याद दिली असून याबाबतही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, असे कुपवाड पोलिसांनी सांगितले. तिन्हीही मृत (Dead bodu) देहाची (corpse) उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.