corona positive bacchu kaduऑनलाइन टीम- 

राज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती स्वत: त्यांनी ट्विट करुन दिली आहे. यामध्ये माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी (swab test) करून घ्यावी असे आवाहन देखील बच्चू कडू यांनी केले आहे.


------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

बच्चू कडू दिल्लीतील शेतकरी आंदोनलनामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी अमरावती ते दिल्ली असा दुचाकीवरुन प्रवास केला होता. गेल्या काही दिवसांमध्ये कडू यांना कोरोनाची लागण (swab test) झाली होती. त्यांनतर परत आता त्यांना कोरोनाचा लागण झाली आहे. मात्र त्यांची तब्बेत स्थिर असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.