#bigboss14 winnerentertainment news- कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस १४' चा (#bigboss14) आज ग्रॅण्ड फिनाले आहे. या सीजनचा विजेता कोण ठरणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रत्येकाच्या तोंडी कोण जिंकणार, याचीचं चर्चा आहे. सोशल मीडियावर (social media) जिथे चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी युद्धाचं वातावरण आहे, तिथे घरातील स्पर्धक रुबीना दिलैक, राहुल वैद्य, अली गोनी, राखी सावंत व निक्की तांबोळी यांबद्दल अनेक ट्विट समोर (#BigBoss14winner) येत आहेत.

जिथे 'बिग बॉस १४'  (#BigBoss14winner)जिंकण्याचा प्रश्न आहे, त्यावर इतर कलाकार त्यांची मतं मांडताना दिसत आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या विजेत्यांच्या नावाचं ट्विट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस १४' च्या विजेत्याबद्दल सांगताना बॉलिवूड अभिनेता आणि 'बिग बॉस' मधील माजी स्पर्धक असलेला एजाज खान याने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर लिहिलं, 'माझ्या मते रुबीना (#rubinadilaik) जिंकली पाहिजे...' त्याने रुबीना च्या बाजूने त्याचं मतं व्यक्त केलं आहे.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

टीव्ही अभिनेता आणि शहनाजच्या स्वयंवराला हजेरी लावणारा अभिनेता मयूर वर्माने देखील 'बिग बॉस १४' च्या विजेत्यापदासाठी रुबीनाला पसंती दिली आहे. त्याने लिहिलं, ' मी वाट पाहत आहे की विजेत्याची ट्रॉफी रुबीना दिलैक उचलेल. फायनल काउंटडाउन सुरू झाला आहे.' अशा पद्धतीने प्रत्येक स्पर्धकाचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराला जिंकवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतायत. विजेतेपदाच्या यादीत रुबीना आणि राहुल यांची नावं सगळ्यात वर घेतली जात आहेत. त्यातही, रुबीनाला विजेती बनविण्यासाठी तिचे चाहते जास्त प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी चाहत्यांकडून सोशल मीडियावर (social media) अनेक ट्विट करण्यात येत आहेत.