criticize to uddhav thackeray  state government


राज्य सरकारने (state government) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील एक निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. राज्याच्या तिजोरीतील खडखडाट हा फक्त जनतेसाठी असून मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही, अशी घणाघाती टीका भातखळकर  (political criticism) यांनी केली आहे.

मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चांवर निर्बंध आणले होते. फडणवीसांच्या या निर्णयाला स्थगिती ठाकरे सरकारने दिल्याचं वृत्त अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमधून राज्य सरकारवर (state government) निशाणा साधला आहे. "मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेले निर्बंध मुख्यमंत्री ठाकरे यांनी रद्द केले. थोडक्यात, तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी आहे. मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही", असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे. 

 

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या विधानानेही राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. हिंदू समाज सडलेला असल्याच्या शरजीलच्या विधानावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शरजीलविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना काल आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर आज उस्मानी विरोधात एफआयआर दाखल करुन घेण्यात आली आहे. सरकारच्या या भूमिकेवरुनही भातखळकर यांनी निशाणा साधला. "शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?", असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला (political criticism) आहे. 

भाजपच्या आंदोलनानंतर एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. "एफआयर दाखल झाला असला तरी त्याला अटक अद्याप झालेली नाही. या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली?", असे सवाल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.