terrible-accident-nagar-aurangabad-highway-five-killed-spot


 

ऑनलाइन टिम :

औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्वीप्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु (Dead) झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी (दि.२२) रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की सोमवारी दि २२ रोजी रात्री दोनच्या सुमारास अहमदनगरकडून औरंगाबाद कडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच १९ वाय ७१२३) व औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कार(क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहे. मयत (Dead) जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते.अपघातात स्विफ्ट कार ट्रॅव्हल्स च्या समोरील बाजूस घुसल्याने स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलिस नाईक अशोक नागरगोजे,पोलीस नाईक बबन तमनर,पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय (Hospital) नेवासा फाटा येथे हलवले परंतु सर्व पाच ही जण उपचारापूर्वीच मयत झाले असून पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहे.