Allu Arjunentertainment news- तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) व्हॅनिटी व्हॅनला अपघात (accident) झाला आहे. शनिवारी अल्लू अर्जुन हैदराबादमध्ये होता. आपल्या आगामी 'पुष्पा' चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो हैदराबादमध्ये पोहचला होता. अल्लू अर्जुन त्याच्या व्हॅनिटीमधून प्रवास करून परतला होता. त्यावेळी शनिवारी त्याच्या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाला आहे.

आंध्रप्रदेशातील मरुदुमलीतून हैदराबाद येथे जाताना हा अपघात (accident) झाला. एका दुसऱ्या वाहनाने अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटीला मागून टक्कर मारली. दुर्घटनेवेळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक जणांनी त्याच्या व्हॅनिटीसोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. या घटनेबाबत पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. या दुर्घटनेवेळी व्हॅनिटीमध्ये अभिनेता नव्हता. व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप टीमचे काही सदस्य होते. सुदैवाने अपघातात कोणालाही मोठी गंभीर दुखापत झालेली नाही. परंतु किरकोळ दुखापत झाल्याची माहिती नाही.------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------


काही वर्षांपूर्वी अल्लू अर्जुनने ही व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले होते. त्याने 7 कोटी रुपयांत ही व्हॅनिटी खरेदी केली होती. फाल्कन (Falcon) असं त्याच्या व्हॅनिटीचं नाव आहे.

अल्लू अर्जुन आगामी 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मदानाही स्क्रिन शेअर करणार आहे.