ऑनलाइन टिम :
देशातील कोट्यवधी युजर्संसाठी बॅड न्यूज आहे. लवकरच टेलिकॉम कंपन्या (telecom company) आपला रिचार्ज प्लान महाग करणार आहेत. रिलायन्स जिओ टेलिकॉम सेक्टरमध्ये आल्याने युजर्संना स्वस्तात डेटा आणि फ्री कॉलिंग मिळत होती. अन्यथा टेलिकॉम कंपन्यांनी खूप सारा चार्ज वाढवला असता. परंतु, आता देशातील युजर्संसाठी एक बॅड न्यूज येत आहे. देशातील टेलिकॉम कंपन्या आपला रिचार्ज प्लान महाग करणार आहेत.
युजर्संना आता डेटा आणि व्हाइस कॉलिंग साठी जास्त पैसे मोजायची तयारी ठेवावी लागणार आहे. कारण, आता नेटवर्क प्रोव्हाइडर कंपन्या आता मोबाइल टॅरिफ रक्कम वाढवणार आहे. पुढील आर्थिक वर्ष म्हणजे १ एप्रिल २०२१ - २२ मध्ये नेटवर्क प्रोव्हाइडर कंपन्या आपली मिळकत वाढवण्यासाठी किंमत वाढवणार आहे. कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क कंपन्यांनी आपला टॅरिफ दर वाढवला आहे.
Must Read
1) आजचे राशीभाविष सोमवार,15 फेब्रुवारी २०२१..!!
2) इचलकरंजीचे श्रीमंत घोरपडे नाट्यगृह दुरवस्थेत..!!
3) धावत्या रेल्वेत ओळखीच्या व्यक्तीनेच केला मुलीवर अत्याचार..!!
मार्केटमध्ये राहण्यासाठी नेटवर्क प्रोव्हाइडर कंपन्यासाठी (telecom company) एव्हरेज रिव्हेन्यू असणे गरजेचे आहे. मार्केटमध्ये कंपन्याकडे खूप सारे ग्राहक आहे. परंतु, आवश्यक हिशोबाप्रमाणे अॅव्हरेज रिव्हेन्यू वर कस्टमर कमी आहे. त्यामुळे कंपन्या रिचार्ज प्लान्स मध्ये वाढ करू शकतात. आता ग्राहकांना २ जी वरू ४ जी मध्ये अपग्रेड केल्यानंतर अॅव्हरेज रेवेन्यूवर युजरमध्ये सुधारणा होणार आहे.
पुढील दोन वर्षात इंडस्ट्रीची आर्थिक मिळकत ११ ते १३ टक्के आणि आर्थि वर्ष २०२२ मध्ये हे जवळपास ३८ टक्क्यांपर्यंत जास्त होणार आहे. देशात करोना महामारी सुरू असल्याने सर्व इंडस्ट्रीजवर परिणाम झाला आहे. परंतु, टेलिकॉम इंडस्ट्रीवर काही परिणाम झाला नाही. लॉकडाउन दरम्यान वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लास, व्हिडिओ स्ट्रिमिंगमुळे जास्त डेटाचा वापर करण्यात येत आहे.