Swarajya Din.ऑनलाइन टिम:

भावी पिढीसमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार राहावा, त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी यंदाच्या शिवजयंतीच्या निमित्ताने ८ दिवसांत सरकारने निर्णय घेतला असून परिपत्रक येथून पुढे प्रत्येक महाविद्यालयात स्वराज्य दिन साजरा केला जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक (Circular) आठ दिवसांत काढले काढणार : उदय सामंत जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज केली.कोल्हापुरात सायबर महाविद्यालयात (College) आयोजित कार्यक्रमापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. सामंत म्हणाले, काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

 कोरोना प्रादुर्भावाचा विद्यार्थ्यांवर (Student) परिणाम होऊ नये, यासाठी कुलगुरूंशी चर्चा केली आहे. कोरोना वाढत राहिला तर याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी राज्य सरकार आवश्यक ती खबरदारी घेईल.'मंत्रालय उपक्रम आपल्या दारी खर्चाबाबतचा विषय हा मुंबई विद्यापीठापुरता मर्यादित होता. विद्यापीठांनी खर्च लादला नसल्याबावते पुरावे दिले आहेत. उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचा (College)  एक रुपया खर्च झाला नाही. माझ्या मानधनातील पेशातून तेथील हॉल बुक करण्यात आला होता. विरोधकांनी केलेले आरोप खोटे आहेत.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

 कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण विभागाचा आढावा मंत्रालयातील अधिकारी घेत आहेत. हा टप्पा पुढे असाच सुरू राहणार आहे. हा उपक्रम २२ तारखेपासून थांबविला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यानंतर उपक्रम पुन्हा सुरू होईल, असे मंत्री सामंत म्हणाले. राज्याचे अधिवेशन (Convention) टाळण्यासाठी कोरोनाचा बाऊ केला जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री सामंत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमध्ये वाढल्याचे सांगितले. गुजरातचे अधिवेशन होऊ नये, यासाठी कोरोना वाढला आहे का, याचादेखील आ. पाटील यांनी विचार करावा, असा प्रतिटोला त्यांनी लगावला.