Twice at the place where the bodies


ऑनलाइन टिम:

Crime News- कोल्हापूर  पाचगावमधील वृद्धेच्या खून (Murder) प्रकरणातील संशयित संतोष परीट याने मृतदेह टाकलेल्या राजाराम तलाव परिसरातील जागेवर मृतदेह (Corpses) तेथेच आहे का, याची खातरजमा घटनास्थळी जाऊन दोन वेळा केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.सोन्याच्या दागिन्यांच्या (jewelry) हव्यासापोटी शांतबाई आगळे-गुरव या वृद्धेचा संशयित परीट याने टाकाळा येथील अपार्टमेंटमधील राहत्या खोलीत भिंतीवर डोके आपटून खून केला. त्यांनतर वृद्धेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. त्यानंतर मृतदेह वाकवून पोत्यात भरला. ते पोते आपल्या मोपेडवरून राजाराम तलाव परिसरात नेले. 

-----------------------------

Must Read

-------------------------------

भरदिवसा मृतदेह  (Corpses)  टाकल्यानंतर त्याने दोन वेळा मृतदेह तेथेच आहे का, याची खातरजमा केली. ही बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. संशयिताने राजाराम तलाव परिसरात मोपेडवरून जाण्यासाठी ज्या मार्गाचा वापर केला. त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज ताब्यात घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.चौकत वृद्धेचे दागिने संशयिताने दोन वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवून त्यातून दोन लाख रुपये कर्जाऊ उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे पोलिसांनी चौकशी केली आहे. ती कागदपत्रे लवकरच ताब्यात घेतली जाणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिली.