Suicide of young manऑनलाइन टिम :

Crime News-कोल्हापूर चुये (ता. करवीर) येथील तरुणाने राहत्या घरी विष प्राशन (Poisoning) करून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी ही पटना अनिकेत पाटील घडली. अनिकेत गोविंद पाटील (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याच दरम्यान गावातील एका तरुणीनेही कोल्हापुरातील आर. के. नगर येथे नातेवाईकांच्या घरात विष प्राशन केले. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार (Treatment) सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. एकाच गावातील तरुण-तरुणीने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येचाप्रयत्न केल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.

----------------------------

Must Read

------------------------------

अनिकेत बीएस्सीचे शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याचवेळी त्याने राहत्या घरात विष प्राशन  (Poisoning) केले. त्याला तातडीने सीपीआरमध्ये (cpr) दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजता त्याचा मृत्यू (Death) झाला. याच गावातील एक तरुणी कोल्हापुरातील आर. के. नगर येथे राहणान्या आपल्या मामांकडे आली होती. तिने दुपारी मामाच्या घरात विष प्राशन केले. नातेवाईकांनी तिला तातडीन कोल्हापुरातील खासगी रुणालयात दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.