Chandrasekhar Srivastava commit suicideentrainment news- दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवचे (Chandrasekhar Srivastava) निधन झाले. चंद्रशेखर एक उत्तम अभिनेता होता आणि मॉडेलही होता. खास गोष्ट म्हणजे चंद्रशेखरने वेब सीरीज वल्लमई थारायोमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. चंद्रशेखर श्रीवास्तवच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. असे सांगितले जात आहे की, चंद्रशेखर श्रीवास्तवचे कुठलेच शूट नव्हते, आणि तो घरीच होता. चंद्रशेखर श्रीवास्तवचा मृतदेह (suicide)त्याच्याच घरात लटकलेला आढळला.


-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

चंद्रशेखर श्रीवास्तवने नेमक्या कुठल्या कारणास्तव आत्महत्या (suicide) केली हे पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. मात्र, असे म्हटले जाते की, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता. चंद्रशेखर या अनपेक्षित मृत्यूने नेटिझन्स हादरले आहेत. चंद्रशेखरच्या चाहत्यांना विश्वासच बसल नाही की, या जगात तो नाही.

यापूर्वी दक्षिणात्य अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या केली होती. या अभिनेत्याने 2020 मध्ये जगाला निरोप दिला होता. होम टाऊन मंड्यामध्ये या अभिनेत्याने आत्महत्या केली होती. सुशीलच्या मृत्यूने त्याचे हितचिंतक, मित्र आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला. अवघ्या 30 वर्षांचा सुशील गौडा रोमँटिक टीव्ही शो अंतापुरामध्ये अभिनय करण्यासाठी ओळखला जात होता.