SJVN Apprentice Recruitment


ऑनलाइन टिम :

Recruitment- एसजेव्हीएनने अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी ग्रॅज्युएट (SJVN Apprentice Recruitment) अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिसच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी 10वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेची सुरुवात आज म्हणजे 16 फेब्रुवारी 2021 पासून झाली आहे.

महत्वाच्या तारखा

* ऑनलाइन अर्जाची सुरुवात- 16 फेब्रुवारी 2021

* ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

पदांची संख्या (Recruitment)

* ग्रॅज्युएट अप्रेंटिस- 120 पदे

* डिप्लोमा अप्रेंटिस- 60 पदे

* आयटीआय अप्रेंटिस- 100 पदे

* एकुण पदे- 280

वेतन

* ग्रॅज्युएट अप्रेंटिस- 10,000 रुपये प्रति महिना

* डिप्लोमा अप्रेंटिस- 8,000 रुपये प्रति महिना

* आयटीआय अप्रेंटिस- 7,000 रुपये प्रति महिना

--------------------------

पात्रता (SJVN Apprentice Recruitment)

* ग्रॅज्युएट अप्रेंटिस – या पदासाठी उमेदवाराकडे एआयसीटीईकडून मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी किंवा संस्थेकडून इंजिनियरिंगची डिग्री असणे अनिवार्य आहे.

* डिप्लोमा अप्रेंटिस – या पदावर अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे मान्यप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा संस्थेतून इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा असणे अनिवार्य आहे.

* आयटीआय अप्रेंटिस – या पदासाठी उमेदवार 10 वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

* 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क

* सामान्य/ ओबीसी वर्गासाठी – 100 रुपये

* एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी वर्गासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

उमेदवारांची निवड

* मॅट्रिक्युलेशन, आयटीआय आणि ग्रॅज्युएशनच्या गुणांच्या आधारावर निवड केली जाईल. यासाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.