gold silver rate today


केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचे भाव कमी-कमी होत असल्याचे तीन दिवसांपासून चित्र आहे. चांदी तीन हजार रुपयांनी घसरुन ७० हजार रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ६०० रुपयांनी घसरण (gold silver rate today) होऊन ते ४८ हजार ९०० रुपयांवर आले.

दरम्यान , पहिल्या दिवशी चांदीच्या (gold silver rate today) भावात एक हजार रुपयांनी घसरण झाली तर मंगळवारी एक हजार ५०० रुपयांनी घसरण झाली. त्यानंतर बुधवार तिसऱ्या दिवशी ही घसरण आणखी वाढून थेट तीन हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी झाले व ती थेट ७० हजार रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे सोन्याच्या भावात पहिल्या दिवशी ५०० रुपयांनी व दुसऱ्या दिवशी मंगळवारी ४०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा ६०० रुपयांनी घसरण होऊन सोने थेट ४८ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले. अर्थसंकल्पाच्या (Union Budget) दिवशी दरातील चढउतार कायम होते.

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

शेअर बाजारात उसळी सुरूच

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी केलेल्या तरतुदींमुळे तसेच बहुतांश घटकांवर आयात शुल्काचा भार वाढल्याने स्थानिक कंपन्यांना वाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर बाजारात उसळी सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सराफ बाजारात घसरण सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.