shivjayanti-mahotsav-karachi-pakistan-udayanraje-bhosale-satara-marathiमहाराष्ट्राप्रमाणेच यावर्षी पाकिस्तानमध्येही भगवा फडकणार असून, छत्रपती शिवरायांचा जयजयकार तेथील आसमंतात भरून राहणार आहे. कराचीत मराठी बांधव दणक्‍यात शिवजयंती साजरी करणार आहेत. आज (रविवार ता. 21) हा कार्यक्रम करण्यास तेथील शासनाने परवानगी (Permitted) दिली असून, ऑनलाइन  होणाऱ्या या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले हेही सहभागी होणार आहेत. पाकिस्तानमध्ये पिढ्यान्‌ पिढ्या मराठी बांधव राहात आहेत. गायकवाड, भोसले, दुपटे, रजपूत, जगताप, अटकेकर अशी मराठी कुटुंबे (Family) कराचीत स्थायिक आहेत. 

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

तसेच एकूण पाकिस्तानमध्ये सुमारे 700 मराठी कुटुंबे (Family)  पिढ्यान्‌ पिढ्या राहात आहेत. त्यांच्या मराठीवर उर्दुचा प्रभाव पडला आहे. या पिढीतील लहान मुलांना आणि मोठ्यांनाही मराठी भाषा शिकायची असल्याने येथील स्वप्न स्टडीजच्या माध्यमातून दिलीप पुराणिक आणि स्वप्निल पुराणिक (Mythological) हे मराठी भाषा ऑनलाइन शिकवितात. याबरोबरच आपला सारा इतिहासही त्यांना ज्ञात करतात. हे मराठी बांधव आता कराचीत शिवजयंती साजरी करणार (Permitted)  आहेत. तेथील शासनाने रविवारी (ता.21) शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती दिलीप पुराणिक यांनी दिली.