indian politics- केंद्र सरकारच्या (central government) नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आज देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या चक्का जाम आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. यावरून भाजपाचे (political party of india)  नेते आशिष शेलार यांनी काँग्रेससह शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट (tweet) केले आहे. यामध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा यांची काँग्रेस-शिवसेनेने बाजू घेतल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. "देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने 'पॉप डान्स' केला. तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात," असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

याचबरोबर, दुसऱ्या ट्विटमध्ये (tweet) आशिष शेलार यांनी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर 'ट्रॅक्टर' फिरवणार का? असा सवाल करत शिवसेनेवर (political party of india)  टीका केली आहे. "वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला. त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्काजाम' झालाय ? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर 'ट्रॅक्टर' फिरवणार का?", असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.