share market trading


ऑनलाइन टिम :

share market trading- आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने जोरदार उसळी मारली आहे. 30 शेअर्सचे निर्देशांक सेन्सेक्स (Sensex Today ) 363 अंकांच्या वाढीसह थेट 51907 वर उघडला आहे. खरंतर, आत पहिल्यांदाच सेन्सेक्सने 52000 चा आकडा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारा अनेक रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत. 

आजही सकाळी 9.28 वाजता तो 485 अंकांच्या वाढीसह 52,029 वर व्यापार करत होता. इतकंच नाहीतर निफ्टीही 50 आज सकाळी 107 अंकांच्या वाढीसह 15270 वर उघडला. यावेळी 138 अंकांच्या वाढीसह 15301 च्या पातळीवर बाजार सुरु होता. (business news share market today sensex for the first time crossed 52000 level here is all details)

--------------------------

सध्या सेन्सेक्सचे 30 पैकी 21 शेअर्स हे ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांनाही याचा चांगलाच नफा झाल्याचं पाहायला मिळतं. बँकिंग शेअर्समध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक सगळ्यात टॉपवर आहेत. दुसरीकडे, ओएनजीसी, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि सन फार्मा या कंपन्यांचा घसरल्याचं पाहायला मिळत आहे.

विदेशी गुंतवणूकदार वारंवार शेअर बाजारात गुंतवणूक (share market trading) करत असतात. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात 22,038 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर, या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्समध्ये 20,593 कोटी रुपये आणि कर्जामध्ये 1,445 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत निव्वळ गुंतवणूक 22,038 कोटी रुपये होती.

गुंतवणूकदारांनी काय करावं

भारतासह जगातील शेअर बाजारामध्ये (share market) तेजी पाहायला मिळेल. शेअर बाजारांचे इंडेक्स वधारणार नसले तरी मिड कॅप आणि स्मॉलकॅफ शेअर्समध्ये तेजी असेल, असा अंदाज ब्रोकरेज फर्म वर्तवत आहेत.येत्या काळात एलं अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक वाढू शकते. पुढील एक वर्षात निफ्टी 15 हजार ते 16 हजारादरम्यान राहील, असा अदाज वर्तवण्यात आला आहे.