shahrukh khanentertainment news- जेव्हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन लहान होता तेव्हा लोक तो अगदी गौरी खानसारखा दिसतो असं चाहत्यांना वाटायचं. पण आता मात्र त्याचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यावर आर्यन खान हुबेहूब आपल्या वडिलांसारखा दिसतो असं कोणीही म्हणेल. अनेकांनी सोशल मीडियावर तर त्याला शाहरुखची कार्बन कॉपी असल्याचंही म्हटलं आहे. शाहरुख कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे. आयपीएल २०२१ च्या लिलावात आर्यन त्याच्या वडिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेला होता. त्याच्यासोूत जुही चावलाची मुलगी जाह्नवीही होती. जान्हवीचेही अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral) होत आहेत.

बॉडी लॅग्वेज पाहिल्यावर लोक म्हणाले, शाहरुख आला

लिलावा दरम्यानचे आर्यनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात त्याचे हावभाव आणि चालण्याची पद्धतही अगदी शाहरुखसारखीच आहे. त्याची देहबोली, केसांची स्टाइल सगळ्यातच शाहरुखची झलक दिसते. आयपीएलच्या लिलावात फक्त आर्यन खानवरच चाहत्यांची नजर होती असं नाही, तर जुही चावलाची मुलगी जाह्नवीही चर्चेत होती. जुहीने स्वतः तिच्या ट्विटरवर अकाउंटवरून (twitter account) एक फोटो शेअर करत लिहिले की, ऑक्शन टेबलावर केकेआर किड्स आर्यन आणि जाह्नवीला पाहून फार आनंद वाटतोय. (entertainment news)


------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

आर्यनला कॅमेर्‍याच्या मागेच राहण्यात रस

शाहरुखच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आर्यनचे बरेच फोटो शेअर  (video viral) करत त्याच्यासाठीचं प्रेम व्यक्त केलं. शाहरुख खानची मुलगी सुहाना यापूर्वीच लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. आता चाहत्यांना आर्यनच्या पदार्पणाची प्रतीक्षा आहे. आर्यनने याआधीच 'लायन किंग' सिनेमात व्हॉईस ओव्हर देऊन लोकांना आपल्या प्रेमात पाडलं आहे. पण शाहरुखने अनेक मुलाखतीत स्पष्ट केलं आहे की, आर्यनला कॅमेऱ्याच्या समोर येण्यापेक्षा कॅमेऱ्याच्या मागेे राहून काम करायला जास्त आवडतं. त्याची गोडी दिग्दर्शनात जास्त आहे.