Security forces in action again in Jammu and Kashmirऑनलाइन टिम :

काश्मीरमधील श्रीनगर येथे कृष्णा ढाबावर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक केल्यावर पोलीस आणि सैन्याने अनंतनागच्या जंगलातील दहशतवादी (Terrorist) ठिकाणाचा भांडाफोड केला आहे. संयुक्त मोहिमेत सुरक्षा दलांनी (security forces) अनंतनागच्या जंगलातून 3 एके-56 रायफल्स, दोन चिनी पिस्टल, दोन चिनी ग्रेनेड, एक दुर्बीण, 6 एके मॅगजीन समवेत अन्य सामग्री हस्तगत केली आहे. तर जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहतवादी कारवाया वाढण्याची शक्यता पाहता खोऱयातील सुरक्षा (security) वाढविली आहे. सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणांवर सुरक्षा वाढविण्याचा आदेश काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिला आहे. 

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

काश्मीरच्या सर्व उंच इमारतींवर स्नायपर्स तैनात करण्यात आले आहेत. स्थायी बंकर्सची जागाही आता बदलली जात आहे. याचबरोबर पूर्ण खोऱयात दहशतवादविरोधी मोहिमेला वेग देण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच श्रीनगरच्या एका बाजारात दहशतवाद्यांनी   पोलीस पथकावर हल्ला केला होता. तेथली बागत बारजुल्ला भागात दहशतवाद्याने एके-47 द्वारे अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन पोलिसांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. दहशतवाद्यांनी आता छोटे हल्ले करण्याचे सत्र आरंभिल्याने सुरक्षा दलांकडून  (security forcesविशेष पावले उचलली जात आहेत.