SBI

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणारी SBI (State Bank of India) ग्राहकांना नो युअर कस्टमर (Know Your Customer KYC) ही सुविधा देते. याअंतर्गत ग्राहकांना काही कागदपत्र जमा करावी लागतात, त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. या प्रक्रियेअंतर्गत बँक त्यांच्या ग्राहकांबाबत पूर्ण माहिती घेते, ज्यामुळे ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरं जावे लागत नाही आणि बँकेच्या सुविधा देखील ग्राहकांपर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय (kyc) पोहोचतात. जेव्हा तुम्ही खाते उघडता तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जाणून घ्या याकरता कोणती कागदपत्र आवश्यक आहेत.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

बँकेला वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांचे केवायसी डिटेल्स अपडेट करावे लागतात. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्याबाबतची ही बेसिक माहिती द्यावी लागते आणि ती व्हेरिफाय देखील करावी लागते.

कशाप्रकारे अपडेट कराल  kyc?

-ग्राहकांना त्यांच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जावं लागेल

-याठिकाणी तुम्हाला आवश्यक कागदपत्र द्यावी लागतील

-ग्राहकांना ओळख प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा दाखला द्यावा लागेल

-पर्सनल खातं असणारे ग्राहक पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्डचा देखील वापर करू शकतात.

-जर खातेधारक अल्पवयीन आणि आणि 10 वर्षांपेक्षाही त्याचे वय कमी आहे तर जी व्यक्ती ते खाते सांभाळत आहे त्याचे आयडी प्रूफ लागेल.

-जर अल्पवयीन त्याचे खाते स्वत: ऑपरेट करत असेल तर त्या व्यक्तीची KYC अपडेट ओळख पत्र किंवा वास्तव्याचा दाखल्याचं व्हेरिफिकेशन करून किंवा या इतर व्यक्तींचे ज्याप्रमाणे व्हेरिफिकेशन होत आहे त्याचप्रकारे होईल

NRI ग्राहकांसाठी काय पर्याय?

जर ग्राहक NRI असेल तर  KYC साठी त्याला त्याचा पासपोर्ट किंवा व्हिसा देता येईल. रेजिडेन्स व्हिसा फॉरेन ऑफिसर्स, नोटरी, इंडियन एम्बसी, संबंधित बँकेचे ऑफिसर यांच्याकडून व्हेरिफाय झाला पाहिजे.

वास्तव्याच्या प्रमाणपत्रासाठी देऊ शकता ही कागदपत्र

-टेलिफोन बिल (जे 3 महिन्यापेक्षा जुने नसावे)

-बँक (State Bank of India)  खात्याचा तपशील विवरण (जे 3 महिन्यापेक्षा जुने नसावे)

-मान्यता प्राप्त सरकारी प्राधिकारी द्वारे जारी पत्र

-वीजबिल (जे 6 महिन्यापेक्षा जुने नसावे)

-रेशन कार्ड

-विश्वसनीय नियोक्तांकडून जारी करण्यात आलेले ओळखपत्र

-क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (जे 3 महिन्यापेक्षा जुने नसावे)

-नोंदणीकृत लीव्ह आणि परवाना करार / विक्री करारनामा / लीज कराराच्या प्रती

-विद्यापीठ/संस्थेच्या हॉस्टल वार्डन द्वारा त्याठिकाणी राहण्याचे विद्यार्थ्यांना देण्यात आलेले पत्र, जे रजिस्ट्रार, प्रिंन्सिपल/डीन–विद्यार्थी कल्याण द्वारा अटेस्टेड केलेले असेल.आरबीआयच्या मते बँकांना निश्चित कालावधीनंतर केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. बँकांनी ग्राहकांना वेळोवेळी नोटीस देणे आवश्यक आहे की त्यांचे केवायसी अपडेटेड आहे की नाही.