vijay devarakonda and sara ali khanऑनलाइन टिम :

entertainment center- अर्जुन रेड्डी फेम दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा आगामी चित्रपट लायगरमधून एन्ट्री करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे झळकणार आहे. विजय देवरकोंडाचा 'लायगर' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या दरम्यान विजयचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल  (viral on social media) होत आहे. ज्यात त्याच्यासोबत सारा अली खान दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी वेगळेच तर्कवितर्क लावायला सुरूवात केली.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकताच आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर विजय देवरकोंडा याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच साराने याला एक 'फॅन मोमेंट' असे संबोधले आहे. या फोटोत विजयने ग्रे रंगाचा टी-शर्ट घातला आहे, तर सारा ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.----------------------------साराने पहिल्यांदाच विजयची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून त्यावर असंख्य चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी सारा आणि विजय यांची जोडी परफेक्‍ट असल्याचेही म्हटले आहे. (entertainment center)

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास 'अर्जुन रेड्‌डी' चित्रपटानंतर विजय देवरकोंडाला खूपच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

तर सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिचा कुली नंबर १ चित्रपट नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. यात तिच्यासोबत वरूण धवन मुख्य भूमिकेत होता. याशिवाय ती 'अतरंगी रे'मध्येही झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर मुख्य भूमिका साकारत आहे.