farmer protest


पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास (farmer protest) पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱ्या शेतकऱयांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना 'देशद्रोही' ठरवले जाईल, अशा शब्दांत शिवसेनेचे (political party in india) खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

परदेशातील कलाकारांनी शेतकरी (farmer) आंदोलनाबाबत ट्विट करताच भारतात कलाकारांमध्येही दोन गट पडल्याचे चित्र आहे. काही कलाकारांनी शेतकरी आंदोलन हा आमच्या देशाचा अंतर्गंत प्रश्न असून बाहेरच्यांनी बोलू नये अशी भूमिका घेतली आहे. तर, काही कलाकारांनी रिहानाच्या ट्विटला समर्थन दिलं आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून भारतातील सेलिब्रिटींना जोरदार टोला लगावला आहे.

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

जगभरातून शेतकरी आंदोलनास (farmer protest)पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व 'सेलिब्रिटीं' नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली. 

‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे त्यात विदेशी हस्तक्षेप नको,' असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या 'सेलिब्रिटीज्' ना उतरवले, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.