Sanjay Rautreal clear politics- ‘आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती’, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केल्यानंतर त्याच शैलीत शिवसेनेकडून त्यांना उत्तर दिले जात आहे. शिवसेना (political party)  खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा ट्विट करत भाजपचे पुन्हा एकदा कान टोचले आहेत. “घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है”, म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut criticizes Amit Shah for commenting on Shivsena)


“तुफान ज्यादा हो तो,

कश्तियाँ डूब जाती है

और घमंड ज्यादा हो तो,

हस्तीयाँ डूब जाती है


असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.


नेमके प्रकरण काय ?

शिवसेनेने भाजपचा हात सोडून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांनतर तब्बल दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर 7 फेब्रुवारी रोजी थेट वक्तव्य केले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना शाह यांनी ‘शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही.  (real clear politics)

---------------------------------

Must Read

1) आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ

2) ...अन्यथा कोल्हापूरचा वणवा राज्यभर पेटेल

3) Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

---------------------------------

तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती,’ असे वक्तव्य केले होते. तब्बल दीड वर्षांनी अमित शाह यांनी शिवसेनेवर (political party) थेट निशाणा साधल्यामुळे शाह यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले होते. त्यनंतर राऊत यांनी शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेत “1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली,” असे असे ट्विट केले होते.

त्यांनतर हा वाद इथेच न संपता राऊत यांनी आज (सोमवार) पुन्हा ट्विट करत गर्व असणाऱ्या कित्येक व्यक्तींचं अस्तित्व संपलेलं आहे, असे म्हणत शाह यांना टोला लगावला.

7 फेब्रुवारीच्या ट्विटमध्ये राऊत यांनी “माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना संपेल असे भाकीत केले होते. मात्र, शिवसेना प्रत्येक वेळी अधिक जोमाने वाढली आहे,” असेही ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरण्याची शंका व्यक्त केली जात होती. मात्र, राऊतांच्या त्या ट्विटनंतर काँग्रेसकडून अजूनतरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.