sangli murder caseऑनलाइन टिम :

crime news- मुलाने जन्मदात्या साठ वर्षीय आईच्या डोक्यात लोखंडी खोरे घालून निर्घृण खून केल्याची घटना आंबेगाव (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे घडली आहे. खून (murder) करून तब्बल12 दिवस फरार असलेल्या आरोपीला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

जनाबाई शिवाजी माने (वय 60, रा. आंबेगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आप्पासाहेब शिवाजी माने (वय 34) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीचा सख्खा भाऊ सत्यवान शिवाजी माने कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

---------------------------

कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनाबाई माने यांचा मुलगा आप्पासाहेब हा काहीही कामधंदा करत नसल्याने त्या नेहमी त्याला काहीतरी कामधंदा कर असे म्हणत असत. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास जनाबाई या घराबाहेर कपडे धूत होत्या. यावेळी जनाबाई यांनी आप्पासाहेबला, किती दिवस तू असा न काम करता राहणार आहेस, अजून किती दिवस तुला जेवण घालू असे म्हणाल्या होत्या. 

त्यावेळी या बोलण्याचा राग आल्याने आप्पासाहेबा याने बाजूला पडलेले लोखंडी खोरे हातात घेऊन आई जनाबाई हिच्या डोक्‍यात मारून जखमी (murder) केले. हे पाहून मोठा भाऊ सत्यवान हा पळत त्या ठिकाणी आला असता, आरोपीने हातातील खोऱ्याने सत्यवान यांच्या डोक्‍यात मारले; तसेच वडील शिवाजी माने यांनाही मारहाण केली. यात सत्यवान व वडील शिवाजी माने हे दोघेही जखमी झाले. गंभीर जखमी जनाबाई यांना तत्काळ सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे तपास करीत आहेत.